Welcome

निवासी मूकबधिर विद्यालय,
कऱ्हावागज, ता- बारामती, जिल्हा – पुणे

बारामती तालुक्यातील पहिली निवासी मूकबधिर शाळा – २०१० पासून अखंड समाजसेवा करत आहे.
5० हून अधिक मूकबधिर मुले-मुली येथे मोफत शिक्षण, निवास व भोजन घेत आहेत.
आमचे ध्येय या मुलांना स्वावलंबी व आत्मविश्वासू नागरिक घडवणे आहे.

👉 “मूकबधिर मुलांसाठी आपण करतोय एक नवीन उजेडाचा प्रवास…”

या संस्थेच्या संस्थापक सौ रामेश्वरी नितीन जाधव या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 
N.S.S. च्या माध्यमातून समाजसेवेचे बीज मनात पेरले गेले. त्या प्रेरणेने आणि कुटुंबाच्या पाठबळावर, जून २०१० मध्ये निवासी मूकबधिर विद्यालय कऱ्हावागजची स्थापना केली.

या शाळेत अत्यंत गरीब व मजूर कुटुंबातील मुले-मुली राहतात आणि त्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण, भोजन, निवास, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम दिले जातात.

आज या शाळेला १४ वर्षे पूर्ण झाली असून समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हे कार्य अखंड सुरु आहे.