About Us

Donation

आमच्याविषयी

या संस्थेच्या संस्थापक सौ रामेश्वरी नितीन जाधव या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना 
N.S.S. च्या माध्यमातून समाजसेवेचे बीज मनात पेरले गेले. त्या प्रेरणेने आणि कुटुंबाच्या पाठबळावर, जून २०१० मध्ये निवासी मूकबधिर विद्यालय कऱ्हावागजची स्थापना केली.

या शाळेत अत्यंत गरीब व मजूर कुटुंबातील मुले-मुली राहतात आणि त्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण, भोजन, निवास, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम दिले जातात.

आज या शाळेला १४ वर्षे पूर्ण झाली असून समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हे कार्य अखंड सुरु आहे.

सौ रामेश्वरी नितीन जाधव

(संस्थेच्या संस्थापक)

M.A ( Hindi )
M.A ( Women Studies)
M.S.W { Master In Social Work )
D.Ed ( Hearing Impairment )
*Diploma In Communication and Journalism
*International Make Up Artist

उद्दिष्टे (Objectives)

  • मूकबधिर मुलांचा सर्वांगीण विकास करणे.

  • मुलांना आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने समाजात उभे करणे.

  • समाजात एकरूप करून, स्वावलंबी बनवणे.

  • कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवणे.

  • पालकांचे समुपदेशन, समाज प्रबोधन व शीघ्र निदान उपक्रम राबवणे.

✨ शाळेची वैशिष्ट्ये (Features)

  • बारामती तालुक्यातील पहिली निवासी मूकबधिर शाळा.

  • शिक्षण, निवास, भोजन, वैद्यकीय मदत – सर्वकाही मोफत.

  • सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे.

  • मुलांना सांस्कृतिक, क्रीडा व कलात्मक उपक्रमांत सहभाग.

  • वार्षिक सहली व विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पुरस्कार.

🏆 पुरस्कार व सन्मान (Awards & Recognition)

  • २००९ – वसुंधरा वाहिनी, बारामतीतर्फे समरांगिणी

  • २०१२ – शारदारत्न पुरस्कार, डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्कार

  • २०१३ – स्त्री-शक्ती पुरस्कार, सुमन पुरस्कार

  • २०१४ – शिक्षणनिष्ठ पुरस्कार, संस्कार गौरव राज्यस्तरीय पुरस्कार

  • २०१५ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष सन्मान

  • २०१६ – एस.आर. फाउंडेशन शिवजन्मोत्सव सन्मान

  • २०१७ – K.R.A. ज्वेलर्स पुणे विशेष पुरस्कार

  • २०१९ – बारामती गौरव पुरस्कार

  • २०२० – प्रभात सुपर वुमन राज्यस्तरीय पुरस्कार

  • २०२१ – महाराष्ट्र टाईम्स नवदुर्गा विशेष सन्मान